वडती ता. चोपडा ;- तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण असताना या संकटात उत्पन्नाची नामी संधी समजून शिरजोर झालेल्या वाळू माफियांच्या मुजोरपणा वाढतांना दिसून येत आहे .याचा प्रत्यय 4 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी गोरगावले रस्त्यावर पाहावयास मिळाला . गोरगावले रस्त्यावर अवैध वाळूचे ट्रॅक्टर असल्याची खबर मिळाली असता मंडळाधिकारी आर आर महाजन आपल्या सोबती सह गेले असता त्यांनी अवैध वाळूचे ट्रॅक्टर थांबवले व सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले .पण ट्रॅक्टर चालकाने ऐकले नाही तद्नंतर मंडळाधिकारी आर आर महाजन हे सदर ट्रॅक्टरवर ड्रायव्हरच्या बाजूला बसले व ट्रॅक्टर तहसील कार्यालयाकडे नेण्यास सांगितले पण तरीही ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर गोरगावले गावाकडे नेण्यास सुरुवात केली व थोड्या अंतरावर दहा ते बारा वाळूमाफियांची टोळके उभे होते त्यापैकी ट्रॅक्टर मालक पुढे आला व त्यांनी मंडळाधिकारी महाजन यांना खाली उतरण्यास सांगितले ,मंडळाधिकारी महाजन यांनी खाली उतरण्यास नकार दिल्यावर ट्रॅक्टर मालकाने मंडळाधिकारी यांना अक्षरशः ट्रॅक्टरच्या खाली ओढले व उपस्थित सर्व टोळके मंडळ अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून आले असल्याची माहिती मंडळ अधिकाऱ्यांनी फोन वरून कार्यालयास माहीती दिली .
त्या संदर्भाचे निवेदन अधिकारी व तलाठी संघटनेतर्फे तहसीलदार छगन वाघ यांना देण्यात आले आहे .सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून पुढील तपास कार्य सुरू आहे .
यावर राष्ट्रवादीचे माजी जिल्हाउपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की काही महसूल कर्मचाऱ्यांचा मिलीभगतमुळे रेती माफिया निर्ढावलेले आहेत







