पाचोरा ;-जिल्ह्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता.पाचोरा तालुक्यातील भातखंडे गावातील प्रत्येक नागरीकांची आरोग्य तपासणी घरोघरी जाऊन करण्यात येत आहे.थर्मलनग मीटर,आॅक्सीमीटर मार्फत तपासणी.थर्मलगन मीटरने शरीरातील सर्वसामान्य तापमान 97 ते 100(डिग्री फॅरनहिट मध्ये)35 – 37 डिग्री सेल्सीयस मध्ये.आॅक्सीमीटर , रक्तामधील आॅक्सीजनचे सर्वसाधारण प्रमाण,94 – 100 टक्के पर्यंत. आॅक्सीमटर , सर्वसाधारण नाडीचे ठोके/पल्स रेटचे प्रमाण 70-90,दर प्रति मिनिट. या प्रमाणे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.हि तपासणी डॉ.गुरूदास पाटील ,आशा सेविका,पुष्पलता कुमावत, अंगणवाडी सेविका,कल्पना कुमावत, मनिषा पाटील, प्रियंका कुमावत हे करीत आहेत.तरी गावातील सर्व नागरीकांनी तपासणी करून घ्यावी.असे आवाहन कोरोना समीती अध्यक्ष, सरपंच गणेश वाघ ग्रामसेवक नितीन बोरसे आणि पत्रकार कुंदन बेलदार यांनी केले.