नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- कोरोना संक्रमणातून निवडणूक आयोगही सुटू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि निवडणूक आयुक्त राजीव कुमार कोविड १९ संक्रमित आढळले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, दोन्ही अधिकाऱ्यांचं विधानसभा निवडणुकीसंबंधीचं काम मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुरूच आहे.
सुशील चंद्रा आणि राजीव कुमार हे दोन्ही अधिकारी सध्या घरीच ‘होम आयसोलेशन’मध्ये राहून उपचार घेत आहेत. तसंच घरातूनच ते व्हर्च्युअल बैठकीत सहभागीही होत आहेत. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ते इतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.