मास्क, सॅनिटायझरसह फिजिकल डिस्टन्सिंगचे केले काटेकोर पालन

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रहिवाशी असलेला वृत्तपत्र वाटपाचे काम करून आपली उपजिविका भागवित असलेला आणि सध्या एमपीएससीची परीक्षा देत असलेल्या शालिग्राम उर्फ शालिक याचे लग्न जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील वैशाली हिच्याशी दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी धुमधडाक्यात झाले. मात्र कोरोनाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनासंदर्भात स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारल्याने अनेकांची पाचावर धारण बसली आहे. मात्र शालिक जाधव याचे दि. २३ फेब्रुवारी २०१२१ रोजी जळगावातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात रिसेप्शन ठेवण्यात आले होते. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्याने तात्काळ आपल्या नातेवाईकांना कोरोनाचे नियम आणि उल्लंघन याबाबत माहिती येऊन गर्दी टाळण्याचे आवाहन केले. त्यानुसार मोजक्या वऱ्हाडी आणि मित्रमंडळींनी हजेरी लावून कोरोना नियमांचे पालन करून गोर बंजारा समाजासारख्या मागासलेल्या समाजासमोर एक मोठा आदर्श निर्माण केला असून याचे इतर समाजानेही अनुकरण करावे, असा आदर्श निर्माण करून आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखवून दिली. शिक्षणात भलेही हा समाज मागे असला तरी शालिक सारखा उद्यमी आणि हुशार मुलगा जो एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन तहसीलदार सारख्या उच्च पदावर विराजमान होण्याचे स्वप्न त्याला साकार करायचे आहे. त्यासाठी तो झपाट्याने अभ्यास देखील करीत आहे. आज दि. २३ रोजी त्याचे रिसेप्शन असल्याने त्याने कोरोना नियमांचे सर्वोतोपरी पालन करून येणाऱ्या प्रत्येक नातेवाईक आणि मित्रमंडळींना सॅनिटायझर आणि मास्कचे महत्व पटवून देत एक चांगला आदर्श निर्माण केला. शालिक सारखे अनुकरण इतर समाजानेही करावे, अशी अपेक्षा शालिक याने प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.







