जळगाव;- डॉ. उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकीचे प्राचार्य डॉ. पी आर सपकाळे यांच्या शिरपेचात तिहेरी मुकुट रोवला गेला आहे.
ग्लेशियर जर्नल रिसर्च फाउंडेशन अहमदाबाद यांचेतर्फे बेस्ट प्रिंन्सीपल ऑफ द इयर, आदर्श विद्या सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार तसेच ग्लेशियर जर्नल ऑफ सायंटीफीक रिसर्चच्या संपादकीय विभागात सदस्य म्हणून निवड झाल्यामूळे प्राचार्य डॉ. पी आर सपकाळे यांच्या शिरपेचात तिहेरी मुकुट रोवला गेला आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील यांनी अभिनंदन केले. यावेळी गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ.प्रशांत वारके, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य व परिसर संचालक डॉ.एस.एम.पाटील, डॉ.शैलेश तायडे, डॉ.एस.एम.राठी, अतुल बोंडे, एन.जी.चौधरी उपस्थीत होते.