जळगाव ;- जिल्हा प्रशासनाकडून आज ७६ रूग्णालयांना ४१० इंजेक्शन प्रदान करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात मध्यंतरी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता.
आज जळगाव जिल्ह्यात ७६ खासगी हॉस्पीटल्सला ४१० इंजेक्शन्सचे वाटप करण्यात आले आहे.
या हॉस्पीटल्सची यादी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली असून लिंकवर क्लिक करून आपल्या शहरातील हॉस्पीटल्सला मिळालेल्या इंजेक्शन्सची माहिती जाणून घेऊ शकतात.