चाळीसगाव;- येथील तंबाखू उत्पादक व्हि.एच.पटेल अॅंड कंपनी यांच्या सुर्य छाप या ब्रॅंड नेमचा वापर करत हलक्या दर्जाची नकली तंबाखू विक्री करणारी टोळी चाळीसगाव शहर पोलिसांनी जेरबंद केली असून त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांचा नकली तंबाखूचा 12 पोत्यातील साठा जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईने चाळीसगाव शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.
सुर्य छाप या ब्रॅंडचा वापर करत हलक्या दर्जाच्या तंबाखूच्या लहान व मोठ्या आकारातील पुड्या या छाप्यात आढळून आल्या आहेत. शासनाचे सर्व प्रकारचे कर चुकवत बेकायदा विक्रीला या छाप्याने आळा बसला आहे. सुर्य छाप टोबॅकोचे दुसरे उत्पादक एच.एच.पटेल अॅंड कंपनी व्यवस्थापक नविन हरियाणी यंनी दिलेल्या तक्रारीनुसार चाळीसगाव शहर पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. एन.ए.सैय्यद आदींनी हि कारवाई केली.