शिरसोली (प्रतिनिधी) – शिरसोली प्र.बो. येथे छोट्या व्यवसायिकांना कर्जपुरवठा व वित्तीय सेवा करण्यासाठी शिरसोली ग्रामीण निधी लिमिटेड संस्थेची स्थापना आज करून नायब तहसीलदार दिलीप बारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिरसोली प्र. बो. येथे विर सावरकर शॉपिंग सेंटर मध्ये छोट्या व्यावसायिकांना कर्जपुरवठा करण्यासाठी ग्रामीण निधी लिमिटेड संस्थेची स्थापना करून आज नायब तहसीलदार दिलीप बारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
ग्रामीण निधी लिमिटेड संस्थेचे अध्यक्ष अनिल लोहार यांनी सांगितले की, शिरसोली व आजुबाजुच्या गावातील छोट्यामोठ्या व्यवसायांना कर्जाचा लाभ तसेच बचत खाते उघडण्यात येईल व वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी स्वीकारण्यात येतील. या दृष्टिकोनातून आम्ही या संस्थेची स्थापना केलेली आहे. जेणेकरून गरीब व्यवसायिकांना जळगाव न जाता येथूनच आपल्या अडीअडचणी सोडवता येतील म्हणून आम्ही या संस्थेची स्थापना केली .
या संस्थेचे अध्यक्ष अनिल लोहार,उपाध्यक्ष योगेश फुसे, सचिव ईश्वर मांडगे ,कार्यकारी संचालक दयानंद चव्हाण, व सदस्य पुनमचंद बारी विलास सोनार योगेश वैष्णव यांचा या संस्थेत समावेश आहे.