जळगाव;- विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलचे सहाय्यक शिक्षक प्रदीप मधुकर वाघ यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘शिक्षणशास्त्र’ या विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी “इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा सर्वसमावेशक शिक्षणाकडे बघण्याच्या मनोवृत्तीचा अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर केला आहे. त्यांना एस. जी. व्ही. पी. सी. शिक्षण शास्त्र महाविद्यालय खिरोदा येथील डॉ. नाना नारायण लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.