अमळनेर ;- राज्यातील 2005 नंतर लागलेल्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या आशयाचे निवेदन जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे पदाधिकारीनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले.
निवेदनामध्ये 2005 नंतरच्या सर्व शिक्षकांना जूनी पेशन लागु करण्यात यावी, सातव्या वेतन आयोगानुसारआश्वासित प्रगती योजना लागू करणे, बक्षी समिती खंड 2 प्रकाशित करून राज्य सरकारी कर्मचारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना त्वरीत लाभ प्रधान करणे व अन्य मागण्यानवेदनातून करण्यात आल्या आहे. यावेळी जळगांव जिल्हा जुक्टो संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. सूनील पाटील, उपाध्यक्ष प्रा. बि आर गुलाले ,प्रसिद्धी प्रमुख प्रा.किरण पाटील , प्रा. दिनेश बोरसे, कार्यकारणी सदस्य, प्रा. स्वप्निल पवार, प्रा.पी.एम. पाडवी व इतर सर्व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.









