जळगाव : – जिल्ह्यातील ७८३ पैकी ७२३ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार १५ रोजी मतदान होत आहे. यासाठी मतदान कर्मचारी गुरुवारी सकाळी रवाना झाले. मतदान साहित्यासह कर्मचाऱ्यांना सॅनिटायजर आणि औषधीही देण्यात आली. मुक्ताईनगर तालुक्यातील ५१ पैकी ४७ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. गुरुवारी सकाळपासून मतदान यंत्रावर पोलिंग पार्टी रवाना होत आहे.

…असा आहे बंदोबस्त
पोलीस उपअधीक्षक : ०८
पोलीस निरीक्षक : १९
सहायक निरीक्षक : ९१
कर्मचारी (पुरुष) : १,४९५
कर्मचारी (महिला) : १८१
होमगार्ड : १,६००
एसआरपी प्लाटून : ०५
दृष्टिक्षेपात
एकूण ग्रामपंचायती : ७२३
एकूण इमारती : १,३३३
एकूण जागा : ५,१५४
एकूण बूथ : २,४१५
————————————







