जळगाव ;- जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या कार्यक्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन समाजाला जगाला महिलांचे उच्च स्थान दाखवून देण्याचे सामर्थ्य ज्या महिलांनी केले अशा महिलांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली तसेच त्यांचा जीवनपट त्यांच्या वाणीतून *मी कशी घडली?* हे विद्यार्थ्यांसमोर ठेवले त्यामध्ये *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खेळाडू मेरी कॉम, पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, पहिल्या विदेश मंत्री माननीय सुषमा स्वराज, आयपीएस ऑफिसर किरण बेदी* यांच्या भूमिका साकारल्या. यात लावण्या राजपूत, नितल महाजन, श्रावस्ती सपकाळे, शेजल सैदाणे, शर्वरी राजपूत या विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या. महिलांविषयी आदराने सन्मानाने वागावे त्यांच्या कर्तृत्वाचा आदर करावा तसेच महिला ही विविध रूपातून आपली काळजी घेत असते असे मार्गदर्शन माननीय मुख्याध्यापक सही हेमराज पाटील सर यांनी केले यावेळी मंचावर भूमिका साकारलेले साकारलेल्या कर्तुत्वान महिला ,समन्वयिका सौ वैशाली पाटील, जयश्री वंडोळे तसेच महिला शिक्षिका उपस्थित होत्या