जळगाव ;- जिल्ह्यात कोरोणाचा फैलाव वाढल्याने नागरिकांच्या मनात व खास करून अल्पसंख्यांक समाजात भीती पसरली आहे अशावेळी कोरोना ने कोणाचे निधन झाले तर संसर्गाच्या भीतीने अंत्यसंस्काराला डेथ बॉडी घेण्यासाठी नातेवाईक सुद्धा पुढे येत नाही. अशा स्थितीत गेल्या तीन महिन्यापासून ४० वर्षीय अनिस शाह अय्यूब शाह,हा मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टचा सहसचिव असून सुद्धा त्याने अंदाजे आता पावेतो अनेक म्हणजे जळगावात जे दफन झाले त्या सर्व मृतदेहांवर दफनविधी करणार म्हणजे अनीस शाह एवढेच नव्हे तर कोरोना रुग्णास सोबत आपुलकीने वागणारा त्यांना सहकार्य करणारा वेळप्रसंगी त्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त स्वतः ॲम्बुलन्स जवळून घेऊन जाणे त्याच्या स्वतः प्रेत ताब्यात घेणे तेथून ते कब्रस्तान ला आणणे व कफन लपटून त्याचा दफनविधी करणे हे सर्व कामे तो स्वेच्छेने व फक्त अल्लाच्या मर्जी साठी करीत असून त्याच्या कार्यात तिची धर्मपत्नी फर्जानाच्या ही तिला मनावर दगड ठेऊन सहकार्य करीत आहे . ती फक्त अल्लाहाला खूष करण्यासाठी म्हणून ईदगाह ट्रस्ट च्या विशेष सभेत सचिव फारूक शेख यांनी त्यांच्या या कार्याची महिती सादर करून त्याचा अभिनंदनाच ठराव पारित केला.
मालिक फाउंडेशनतर्फे पी पी ई किट तर ट्रस्टतर्फे शाल,व प्रमाणपत्र
जळगाव मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे लॉक डाऊन असल्यामुळे एका छोटेखानी कार्यक्रमात त्याला शाल व पीपीई कीट देऊन ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक व जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांच्या हस्ते अनीस शाह यास गौरविण्यात आले त्यावेळी मुस्ताक अली सय्यद ,अश्फाक बागवान, नाजिर मुलतानी , ताहेर शेख मजहर शेख, इक़बाल बागवान एडवोकेट सलीम शेख व विशेष आमंत्रित म्हणून अब्दुल वाहाब मलिक उपस्थित होते.
ट्रस्टतर्फे शासनास विनंती
ट्रस्ट च्या सभेत अनिस शाह अय्यूब शाह, कबर साठी खड्डा करणारे शब्बीर पटेल व मृतदेहावर अंत्यसंस्काराला मदत करणारे इसाक बागवान यांना शासनाने महानगरपालिकेच्या अथवा आरोग्य सेवेच्या आस्थापनावर मानसेवी कर्मचारी म्हणून घेण्यात यावे असा ठराव फारुक शेख यांनी मांडला असता त्यास सर्वांनी एक मताने मंजुरी दिली. अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी सदरचा ठराव शासनाला तसेच जिल्हाधिकारी यांना पाठवण्याचे व आपल्या परीने त्यावर सकारात्मक निर्णय होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.