मुक्ताईनगर ;- संत मुक्ताई शुगर एन्ड एनर्जी मुक्ताईनगर आणि कै. ग. सु. वराडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था या संस्थांच्या माध्यमातून रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी आज उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथील कोविड केअर सेंटरला कोविड संक्रमण काळासाठी आठ ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले.
यावेळी उपस्थित रोहिणी ताई खडसे खेवलकर(उपाध्यक्षा संत मुक्ताई शुगर एन्ड एनर्जी मुक्ताईनगर ,अध्यक्षा कै ग सु वराडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था) डॉ योगेशजी राणे (वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय) निवृत्तीभाऊ पाटील बाजार समिती सभापती, राजु माळी माजी प स सभापती,प्रविणभाऊ पाटील माजी सरपंच,प्रदिप साळुंखे, बापु ससाणे, आसिफ भाई बागवान,कल्याण भाऊ पाटील राजुकापसे,संजय कोळी, शिवराज भाऊ पाटील, संजय चौधरी(पोलीस पाटील कोथळी) ,चेतन राजपुत,योगेश पाटील उपस्थित होते.