नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर एकीकडे देशाचा अन्नदाता आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे दिल्लीत पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत पाचही दहशतवाद्यांना अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीमधील शकरपूर परिसरात झालेल्या चकमकीनंतर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि इतर सामग्री जप्त केली आहे.