जळगाव ;- तांबापुरा परिसरातील टिपू सुलतान चौक येथे दोन जण मोटर सायकल वरून संशयित रित्या जात असताना एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद मुकेश पाटील ,असीम तडवी यांना पेट्रोलिंग करीत असताना संशयित रित्या आढळून आले पोलिसांना बघताच बरोबर एक जण मुक्तार शेख राहणार टिपू सुलतान चौक तांबापुरा हा गाडीवरून उतरून गल्लीबोळातून पसार झाला तर दुसऱ्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता राहुल गणेश महाजन वय २१ राहणार टिपू सुलतान चौक तांबापुरा असे सांगितले . दोघांनी मिळून काळ्या रंगाची होंडा शाईन कंपनीची ४०००० रू.किमतीची मोटरसायकल MH19 BK 1445 गणपती नगर येथील घरासमोरून चोरी केल्याचे सांगितले .
याबाबत एमआयडीसी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे सहाय्यक मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील ,अतुल वंजारी ,अशोक संकेत, यांनी याबाबत चौकशी करून सदरील गुन्हा रामानंद पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने आरोपी व मुद्देमाल रामानंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदरील गुन्हा रामानंद पोलिस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता ३७९ प्रमाणे स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.