चाळीसगाव( प्रतिनिधी);-लाभ क्षेत्राचा दाखला देण्यासाठी ५०० रूपयांची लाच घेतांना धुळे लाचलुचपत विभागाने चाळीसगाव लघू पाटबंधारे विभागातील लिपीकाला आज दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास सापळा रचून अटक केली. यामुळे विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांना लघू पाटबंधारे लाभ क्षेत्राचा दाखला मिळविण्यासाठी चाळीगाव लघू पाटबंधारे विभागात याबाबत विचारणा केली होती. विभागातील लिपिक सुरेश बेनीराम वाणी (वय-५४) रा. चाळीसगाव यांना याबाबत भेटले असता त्यांनी दाखल्यासाठी ५०० रूपयांची लाचेची मागणी वाणी यांनी केल्याने तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचून पथकाने आज शुक्रवारी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास सापळा रचून लिपीक सोनवणे हा दाखल्यासाठी ५०० रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. कारवाईमुळे लघू पाटबंधारे विभागात खळबळ उडाली आहे.







