धुळे ;- गॅस टॅकर व लक्झरी बस च्या समोरासमोर धडकेत दोन्ही वाहनांनी पेट घेतला.आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती की देशात लॉक डाऊन चा चौथा टप्प्याला सुरवात झाली आहे.अशातच आज दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान सुरत नागपूर महामार्ग क्रं.6 वर गॅस टॅकर व लक्झरी बस चा समोरासमोर धडक होऊन भिपण अपघात झाला.यात गॅस टॅकर हा धुळ्याहुन जळगाव कडे जात होता तर लक्झरी बस हि जळगावहुन धुळ्याकडे येताना भिरडाणे फाट्या जवळ महामार्गावर दोघ वाहनात समोरासमोर धडक झाली.काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले.आगीत दोन्ही वाहने पुर्ण पणे जुळून राख झाली.फक्त सांगाडा शिल्लक राहिला.आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू झाला.
आकाशात आगीचे व धुराचे 30/35 फुटा पर्यत लोळ उसळले.आगीची माहिती मनपा अग्निशामक दलाला देण्यात आली.अपघात होताच मोठा आवाज झाला.यामुळे गावातील नागरीक महामार्गाकडे आवाजाच्या दिशेने धावले परंतू आगीचे रौद्र रूप पाहता नागरीक हतबल झाले.मनपा अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.फायरमन अधिकारी तूषार ढाके, तुषार पाटील,श्याम कानडे, पांडुरंग पाटील, नरेंद्र बागुल यांनी आगीवर पाणी मारा करत आग आटोक्यात आणली.परंतू या आगीत लक्झरीतील चार जण व टॅकरचा चालक यांचा होरपळून मृत्यू झाला.
महामार्गावर दोन्ही बाजूला चार ते पाच किलोमीटर अंतरावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.तीन क्रेनच्या मदतीने वाहने बाजूला करण्याचे काम सुरू होते.
आगीत महामार्गावरून वीज वाहक तार आगीच्या लोळामुळे तटल्याने तीस गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता.वीज वाहक तार जोडण्याचे काम वीज वितरण कंपनीचे कर्मचारी युध्द पातळीवर करण्याचे प्रयत्नात व्यस्त होते.अंधार झाल्याने कार्यात अडथळा निर्माण होत होता.वाहतूक सुरळीत करण्यात महामार्ग पोलीसांची दमछाक झाली.
अपघात माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ,उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे तालुका पोलीसठाण्यातीलपो.नि.दिलीप गांगुर्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.परंतू उपप्रादेशिक परिवहन विभागाने कोणी हि अधिकारी, कर्मचारी अपघात स्थळी फिरकलेच नाही.
सन 2016 मध्ये याच ठिकाणी कालीपिली महिंद्रा पिक अप गाडी चा अपघात झाला होता.जागीच 16 जण ठार झाले.त्यावेळची तीव्रता व आज परत भिरढाणे फाट्यावर पाच जणांचा अग्नितांडवात होरपळून मृत्यू झाला.अंगावर काटा आणणारी घटना आहे.अपघातामुळे मुकटी कर ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहे.महामार्गावरील ढाब्यावरील सिसीटिव्ही फुटेज तपासून दोन्ही वाहनांचे नंबर शोधण्याचे काम पोलीस करत आहे.तालुका पोलीस ठाण्यात अपघात बाबत रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.