अमळनेर (प्रतिनिधी) ;– राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजना अंतर्गत/ प्राधान्य गटात समाविष्ट न झालेल्या एपीएल/केशरी शिधापत्रिका धारकांना जून 2021 महिन्यात सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती अमळनेर तहसीलदार मिलिंद कुमार वाघ व पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे यांनी दिली.
अमळनेर तालुक्यातील(15331) एपीएल कार्डधारक शिधापत्रिका असून या योजनेतील लाभार्थ्यांच्या एकूण 61977 एवढी सदस्य संख्येत या योजनेची प्रथम मागणी करणाऱ्यास देणे या तत्वावर सदर वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार मिलिंद कुमार वाघ व पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे यांनी केले आहे योजनेचा लाभ प्रत्येक एपीएल केशरी शिधापत्रिका धारकाना(शेतकरी योजनेत /प्राधान्य गटात समाविष्ट न झालेल्या) देण्यासाठी अमळनेर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना सूचना देण्यात आलेल्या आहे.
सर्व एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य माहे जून 2021 करीता सवलतीच्या दराने गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति प्रतिकिलो वितरण करण्याची सूचना रेशन दुकानदारांना करण्यात आलेली आहे.तरी अमळनेर तालुक्यातील सर्व एपीएल केसरी शिधापत्रिकाधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अमळनेर तहसीलदार मिलिंद कुमार वाघ व पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष बावणे यांनी केले आहे.