जळगाव ;- मराठा प्रीमियर लीग स्पर्धा सागर पार्क मैदानावर गेल्या नऊ दिवसांपासून सुरू आहेत. यात ३६ पुरुष व दोन महिला संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा अंतिम सामना मोरया बहुउद्देशीय मित्र मंडळ विरुद्ध पाटील बायोटेक या संघादरम्यान झाला. मोरया बहुउद्देशीय मित्र मंडळ संघाने १० षटकात ७६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, पाटील बायोटेक संघ १० षटकांत ६४ धावाच करू शकल्याने मोरया बहुउद्देशीय मित्र मंडळ संघाने हा समान १२ धवांनी जिंकत विजेते पद पटकावले. सामनावीर कल्पेश देसले ठरला.
विजेता व उपविजेत्या संघांना आमदार रोहित पवार, पद्मश्री उज्ज्वल निकम, माजी आमदार गुलाबराव देवकर, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, करण खलाटे, डी. डी. बच्छाव, अभिषेक पाटील, मनोज पाटील, प्रमोद पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, श्रीराम पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेत मोरया बहुउद्देशीय मित्र मंडळ विजेता तर पाटील बायोटेक संघ उपविजेता ठरला. तर ‘मॅन ऑफ सिरीज’ मुकेश देशमुख, बेस्ट बॅट्समन विरेन पाटील, बेस्ट बॉलर ज्ञानेश्वर चव्हाण, मॅन ऑफ द मॅच म्हणून डॉ. मोनिका जाधव यांना देण्यात आले.







