जळगाव :- पाळधी येथील पत्रकार भूषण महाजन यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे कारोना यांद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी २०२१ रोजी जळगाव येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. . या कार्यक्रमा प्रसगी पत्रकार भूषण महाजन यांना महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आल. कार्यक्रमाप्रसगी पालकमंत्री ना. गुलावराव पाटील, यांनी भूषण महाजन यांचे कोरोना काळातील केलेल्या कामांचे कौतुक करत, कोराना काळात भूषण महाजन यांनी दररोज ५०० नागरिकांना काढा वाटपाचे काम कैले हे मी माझ्या स्वत: डोळ्यांनी पाहिले. पुरस्कार देण्यासाठी योग्य माणसाची निवड कली. असे ना. गुलावराव पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावळी माजी मंत्री गिरीष महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे , दैनिक लोकमतचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी , पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रविण सपकाळे आदि मान्यवर उपस्थित होते.








