जळगाव ;- अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकावर दगडफेक करून एक कर्मचारी जखमी झाल्याची घटना २७ मे रोजी घडली होती . याप्रकरणी १० जणांना शनिपेठ पोलिसांनी आज अटक केली आहे .
शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्ही. डो. ससे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेशसिंग पाटील , सुरेश पाटील , सलीम पिंजारी , हकीम शेख , रवींद्र पवार , रवींद्र पाटील , परीस जाधव , अभिजित सैन्दने , मुकुंद गंगावणे यांच्या पथकाने मो. रेहान मो. आजम बागवान वय २१ , ,मो. युसुफ मो. शकोल बागवान वय ३२ , मो. शकोल मो. अन्दुल बागवान वय ५७ , मो. रियाज हाजी युसुफ बागवान वय ३९ मो. दानिश मो. नासिर वय २६,मो. सईद मो. शकोल बागवान वय ३० मो. ताहेर मो. याकुब बागवान वय २९ , मो. मुज्मील अब्दुल अझीझ बागवान वय २६ , मो. सलीम अब्दुल रहेमान बागवान वय ४९ सालारनगर,माशेअल्ला मोहमदिया अपार्टमेंट रुम नं. ३ जळगाव , मो.मोहसिन उर्फ अशपाक शेख इस्माईल बागवान वय २८ व्यवसाय फळविक्रो रा. ७२,रथगल्ली जोशोपेठ,आदींना अटक करण्यात आली आहे . त्यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला शनिपेठ पोलीस स्टेशन भाग ५ गु. र. न. ३९ / २०२० भा. द. वि. कलम ३०७, ३५३, ३३२, ३३७, १४३, १४७, ३२४, ५०४, ५०६, १८८, २६९ व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कावदा २००५ चे वि | कलम ५१ (ब ) अन्वये ‘ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.