जळगाव तालुक्यातील करंज येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- रस्त्यावर फटाके फोडू नका असे सांगितल्याच्या कारणावरून करंज गावातील एका तरूणाला शिवीगाळ करत दगडाने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २ नोव्हेंबर रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदू सपकाळे (वय ४७, रा. करंज ता. जळगाव) यांनी शुक्रवारी दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता गावातील काही जण फटाके फोडत असतांना रस्त्यावर फटाके फोडू नका असे सांगितले. या कारणावरून राग आल्याने तुषार गणेश पाटील, गौरव नितीन पाटील, शुभम अनिल पाटील, डिगंबर देविदास पाटील, देवा धनसिंग पाटील, उमेश देविदास पाटील, मुकेश संजू पाटील (सर्व रा. करंज ता.जळगाव) यांनी शिवीगाळ करत नंदू सपकाळे यांचा मुलगा संदीप सपकाळे याला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी करत जीवेठार मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार घडल्यानंतर नंदू सपकाळे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी तुषार गणेश पाटील, गौरव नितीन पाटील, शुभम अनिल पाटील, डिगंबर देविदास पाटील, देवा धनसिंग पाटील, उमेश देविदास पाटील, मुकेश संजू पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील हे करीत आहे.