दिल्ली : सात वर्षापूर्वी दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देश एका घटनेने हादरून गेला होता. दिल्लीतील एका तरूणीवर अत्यंत क्रूरपणे सामुहिक बलात्कार करण्यात आला. या बहुचर्चित निर्भया प्रकरणातील पिडितेला सात वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर न्याय मिळाला. २० मार्च २०२० रोजी सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना अखेर फासावर लटकवण्यात आले. पवन या जल्लादाने या चौघांना फासावर लटकवण्याची औपचारिकता पूर्ण केली.
दैनिक जागरण’ने दिलेल्या वृत्तानुसार, निर्भायाच्या दोषींना फासावर दिल्याच्या अनुभवाबद्दल पावन यांना विचारले असता ते म्हणाले, ”निर्भायाच्या दोषींना फासावर लटकवल्यानंतर मिळालेल्या मानधनातून ते आपल्या मुलीचे लग्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी संगीतले. ते म्हणाले, ”या कामाचे जे पैसे मिळतील त्यातून मी माझ्या नैतिक जबाबदाऱ्या पार पाडेन. माझ्या मुलींची लग्न आणि काही कर्जे फेडता येतील, असे पवन यावेळी म्हणाले होते. तसेच एकाच वेळी चार जणांना फाशी देण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. त्या मोबदल्यात मला लाखभर रूपयांचे मानधन नक्की मिळेल. एकाच वेळी लाखभर रूपये बघण्याचीही माझी पहिलीच वेळ असेल. या फाशीची अंमलबजावणी केल्यानंतर मिळालेल्या पैशातून मी माझ्या मुलीचं लग्न करून देईन”, असे ५७ वर्षाच्या पवन यांनी स्पष्ट केले.