• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाकूहल्ल्यात फरकांड्याच्या कापूस व्यापाऱ्यांची हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2021
in क्राईम, जळगाव
0

कारने कट मारल्याचा बनाव करून वाद घालत पैसे हिसकावण्याचा प्रयत्न

जळगाव ( प्रतिनिधी ) – पाळधी ( ता – एरंडोल ) येथील साईबाबा मंदिराजवळ अज्ञात टोळक्याने केलेल्या चाकूहल्ल्यात एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील रहिवाशी कापूस व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला . ही घटना आज रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली .

चाकूहल्ल्यात मृत्यू झालेल्या या व्यापाऱ्याचे नाव स्वप्नील रत्नाकर शिंपी ( वय ३२ ) आहे . स्वप्नील शिंपी हे दिलीप उर्फ गुड्डू राजेंद्र चौधरी ( वय ३२ , रा – फरकांडे ) यांच्यासोबत भागीदारीमध्ये कापसाचा व्यापार करीत होते . आज हे दोघे भागीदार होंडा सिटी कारने ( क्रमांक एम एच ०१ – ए एल ७१२७ ) जळगावला त्यांची रक्कम घेण्यासाठी आले होते जळगावला येऊन ते त्यांना मिळालेले व्यवसायातील जवळपास १० ते १५ लाख रुपये घेऊन माघारी गावी फरकांडे येथे त्यांच्या कारने निघाले होते .

पाळधीजवळ ते साईबाबा मंदिराजवळच्या पेट्रोल पंपाजवळ आले असता मोटारसायकलींवरून आलेल्या अज्ञात ४ ते ५ जणांच्या टोळक्याने शिंपी यांच्या होंडा सिटी कारला त्यांच्या मोटारसायकली आडव्या लावून कट का मारला म्हणून वाद घातला . शिंपी आणि त्यांच्या भागीदाराने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र कार चालवत असलेले स्वप्नील शिंपी यांना कारमधून खेचून या टोळक्याने बाहेर काढले त्यांच्या पाठीवर , मांडीवर चाकूने वार केले . या झटापटीत या टोळक्याने स्वप्निल  शिपी यांच्या ताब्यातून पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र दिलीप चौधरी व स्वप्नील शिंपी यांच्या प्रतिकारामुळे या टोळक्याचा पैसे हिसकावण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही आणि त्यांची ही रक्कम वाचली . हा गदारोळ व आरडा ओरड सुरु असताना जवळच्या पेट्रोलपंपावर असलेले ३ ते ४ लोक या दोघांच्या मदतीला धावून आले . ते लोक येत असल्याचे पाहून सावध झालेल्या हल्लेखोरांच्या तावडीतून चौधरी थोडक्यात वाचले मदतीला आलेले लोक पाहून हे टोळके पसार झाले . स्वप्नील शिंपी गंभीर जखमी अवस्थेत दगड – विटांनी या टोळक्याचा प्रतिकार करत पाळधीच्या दिशेने मदत मिळावी या आशेने धावण्याचा प्रयत्न करीत होते ! त्यांचे जोडीदार दिलीप चौधरी हेही जमेल तसा या हल्लेखोरांचा हल्ला अडवण्याचा प्रयत्न करीत होते .

मदतीला धावून आलेल्या लोकांच्या सहकार्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संस्थेच्या रुग्णवाहिकेतून स्वप्नील शिंपी यांना जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दाखल करताना सी एम ओ डॉ कळसकर यांनी त्यांना मयत घोषित केले . स्वप्नील शिंपी यांचं पश्चात आई – वडील , पत्नी आणि १ मुली असा परिवार आहे . स्वप्नील शिंपी हे घरातील कर्ते आणि एकुलतेएक होते


 

 

Previous Post

बाहेती महाविद्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहात

Next Post

जळगावात बहिणीला घेऊन येत असलेल्या भावाच्या दुचाकीला अपघात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात बहिणीला घेऊन येत असलेल्या भावाच्या दुचाकीला अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीला गेलेली बैलजोडी हस्तगत; पहूर पोलिसांची कारवाई
क्राईम

पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीला गेलेली बैलजोडी हस्तगत; पहूर पोलिसांची कारवाई

October 23, 2026
नेव्हरे धरणात बुडून कैलास चव्हाण यांचा मृत्यू
क्राईम

नेव्हरे धरणात बुडून कैलास चव्हाण यांचा मृत्यू

October 23, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
क्राईम

दापोऱ्यात जुन्या वादातून दोन गट आमनेसामने; विनयभंग आणि मारहाणीच्या परस्परविरोधी तक्रारी

October 23, 2026
जळगावात घरासमोरून दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
क्राईम

जळगावात घरासमोरून दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

October 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीला गेलेली बैलजोडी हस्तगत; पहूर पोलिसांची कारवाई

पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीला गेलेली बैलजोडी हस्तगत; पहूर पोलिसांची कारवाई

October 23, 2026
नेव्हरे धरणात बुडून कैलास चव्हाण यांचा मृत्यू

नेव्हरे धरणात बुडून कैलास चव्हाण यांचा मृत्यू

October 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon