रावेर तालुक्यातील फैजपूर येथे शोककळा
फैजपूर (प्रतिनिधी) : फैजपूर येथील तरुणाच्या दुचाकीला डंपरची धडक बसल्याने पुणे येथे सासवड भागात अपघाती निधन झाले आहे. यामुळे रावेर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
फैजपूर शहरातील पेहेड वाड्यातील रहिवासी भावेश सुरेंद्र चौधरी (२२) या तरुणाचे ८ रोजी शनिवारी पुणे (सासवड) येथे अपघाती निधन झाले. त्याच्या पश्चात आई व दोन बहिणी असा परिवार आहे. दुचाकीवरून भावेश जात असताना रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला धडक बसून भावेशचा जागीच मृत्यू झाला. हलाखीची परिस्थिती असतानासुद्धा इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण होऊन सहा महिन्यांपूर्वीच तो पुणे येथे नोकरीस लागला होता. शनिवारची सुटी असल्याने एका कामानिमित्त जात असताना सासवड येथे अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यावर फैजपूर येथे रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.