यावल ( प्रतिनिधी ) – फैजपूर शहरातील मिरची मैदान परिसरातून एकाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलींद अरूण चौधरी (वय-३८ , रा. जानकी नगर यावल ) हे कुटुंबियासह वास्तव्याला असून ते रेल्वेत नोकरीला आहे. त्याच्याकडे (एमएच १९ सीए ९२५५) क्रमांकाची दुचाकी आहे. मोठा भाऊ तुषार चौधरी यांची मुलगी आजारी असल्याने तुषार यांनी मिलींद चौधरी यांच्या दुचाकीने मुलीला रविवारी रात्री डॉ. प्रशांत वायकोळे यांच्या दवाखान्यात नेले होते . दुचाकी दवाखान्यासमोर लावली. उपचार घेतल्यानंतर तुषार चौधरी दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी आढळली नाही. त्यांनी मित्रांसह दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला पंरतू कोठेही दुचाकी मिळाली नाही. मंगळवारी मिलींद चौधरी यांनी फैजपूर पोलीसात तक्रार दिली. फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अमजद खान पठाण करीत आहेत