निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व
फैजपूर ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील फैजपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.२ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. २१ डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत नगरपरिषदेचे चित्र स्पष्ट झाले. नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीत भारतीय जनता पक्षाच्या दामिनी पवन सराफ यांनी विजय मिळवत फैजपूर पालिकेची धुरा आपल्या हाती घेतली. विजय जाहीर होताच भाजपा कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.
दामिनी सराफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या शेख सुमय्याबी कुर्बान, अपक्ष उमेदवार मोरे कांचन रमेश व शेख परवीन बी. फारूक यांचा पराभव केला. दामिनी सराफ यांना १०,०८७ मते मिळाली, तर त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी शेख सुमय्याबी कुर्बान यांना ९,०५९ मते मिळाली. दामिनी सराफ यांनी १,०२८ मतांची निर्णायक आघाडी घेत विजय संपादन केला.
प्रभागनिहाय निकालात प्रभाग १ अ मधून काँग्रेसचे तडवी हकीम ऐमत (१,८३७ मते) विजयी झाले, तर १- ब मधून राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या शेख सुमय्याबी कुर्बान (१,८२७मते) विजयी झाल्या. प्रभाग २-अ मधून एमआयएमचे शेख युनूस शेख अय्युब (१,३९२ मते) विजयी झाले, तर २-ब मधून काँग्रेसच्या शेख सादिका शेख दानिश (१,५६६ मते) विजयी झाल्या. प्रभाग ३-ब मधून राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या सपुराबी शेख मेहमूद (६७५ मते) विजयी झाल्या. प्रभाग ४-अ मधून भाजपच्या दीपाली जितेंद्र भारंबे (७३६ मते) विजयी झाल्या, तर ४-ब मधून अपक्ष चौधरी विनोद अरुण उर्फ पप्पू (९६९ मते) विजयी झाले. प्रभाग ६-अ मधून भाजपच्या चौधरी जयश्री नरेंद्र (१,१०३ मते) विजयी झाल्या. प्रभाग ७-अ मधून काँग्रेसच्या इंगळे प्रियंका ईश्वर (८३१ मते) विजयी झाल्या, तर ७-ब मधून भाजपच्या मंडवाले महेंद्र अशोक (१,४०० मते) प्रचंड मतांनी विजयी झाले. प्रभाग ८-अ मधून भाजपच्या सुनीता अनंत नेहेते (९९६ मते) विजयी झाल्या, तर ८-ब मधून काँग्रेसचे शेख इरफान शेख इकबाल (९९१ मते) विजयी झाले.
प्रभाग ९-अ मधून भाजपच्या कोळी निकिता प्रकाश (१,३५६ मते) तर ९-ब मधून भाजपचे सुरज रमेश गाजरे (९४७ मते) विजयी झाले. प्रभाग १०-ब मधून अपक्ष भावना संदीप भारंबे (५३९ मते) घेऊन विजयी झाले. आणि १०-क मधून अपक्ष अमिता हेमराज चौधरी (६८१ मते) विजयी झाल्या. एकूण २१ जागांपैकी ५ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यात भाजपचे सागर हरिचंद्र होले (६-ब), सिद्धेश्वर लीलाधर वाघुळदे (१०-अ), निलिमा राजेश महाजन (५-अ), काँग्रेसचे केतन डीगंबर किरंगे (५-ब) आणि राष्ट्रवादी (घड्याळ) चे अन्वर अजगर खाटीक (३-अ) यांचा समावेश आहे. अंतिम निकालानुसार भाजपचे ९, काँग्रेसचे ५, राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे ३, अपक्ष ३ आणि एमआयएमचा १ उमेदवार निवडून आला असून नगरपरिषदेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
मतमोजणीदरम्यान परिसरात मोठी गर्दी झाली होती. निकाल जाहीर होताच विजयी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळण, ढोल, ताशे व डी. जे.च्या गजरात विजयोत्सव साजरा केला. यामुळे काही काळ मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फैजपूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. रामेश्वर मोताळे, पी.एस.आय. नीरज बोकील, मैनौउद्दीन सय्यद यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती नीता लबडे यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे व अधिकारी यांनी सहकार्य केले.









