रावेर (प्रतिनिधी) :- येथील उपविभागीय प्रांताधिकारीपदी परिविक्षाधीन आयएएस अधिकारी देवयानी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची या पदावर बदली करण्यात आली होती. यानंतर त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
युपीएएसी परिक्षेत यश संपादन केल्यानंतर त्यांनी मसुरी येथून प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्यांची फैजपूर येथे बदली करण्यात आलेली आहे. त्यांना सहायक जिल्हाधिकारीपद मिळाले असून त्या प्रांताधिकारी म्हणून काम करणार आहेत. देवयानी या हरियाणातील महेंद्रगड येथील मूळ निवासी असून त्यांनी बिटस पीलानी संस्थेच्या गोवा येथील कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन या विषयात अभियांत्रीकीची पदवी संपादन केली आहे. २०२१ सालच्या युपीएएसी परिक्षेत त्यांनी देशातून अकराव्या क्रमांकाने रँक मिळवत यश संपादन केले होते. यानंतर मसुरी येथील आयएएस अकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना फैजपूर येथे नियुक्ती मिळाली आहे.