जळगाव ;- रेल्वेने पश्चिम बंगाल आणि ओरिसा राज्यांमध्ये येणाऱ्या ‘यास’ चक्रीवादळच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर ३ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात गाडी क्र. ०२८२७ पुरी-सुरत विशेष गाडी (३० मे रोजी सुटणारी ), गाडी क्र. ०८४०६ अहमदाबाद-पुरी विशेष गाडी (२८ मे रोजी सुटणारी), गाडी क्र. ०२२५६ कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी (२९ मे रोजी सुटणारी ) या तीन गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या असल्याचे कळवण्यात अाले अाहे.