जळगाव ( प्रतिनिधी ) – एसएमआयटी महाविद्यालयाजवळून वृध्द व्यक्तीची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. जळगाव शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जयंत पुरूषोत्तम लाड (वय-६४ , रा. एसएमआयटी महाविद्यालय जळगाव) हे सेवानिवृत्त कर्मचारी आहे. त्यांच्याकडे (एमएच १९ डीएफ ६६७०) क्रमांकाची मोपेड दुचाकी आहे. मंगळवारी दुपारी त्यांनी त्यांची मोपेड त्यांच्या घराच्यासमोर पार्किंग केली होती.सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास ते बाहेर आले असता दुचाकी आढळून आली नाही. चार दिवसांपासून त्यांनी परिसरात दुचाकीचा शोधाशोध केली परंतू कोठेही मिळून आली नाही. अखेर शनिवारी दुपारी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो ना प्रफुल्ल धांडे करीत आहेत.