एरंडोल ( प्रतिनिधी ) – राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज एरंडोल मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे .
या पाठिंब्याचे पत्र आज स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना दिले आहे . या पत्राच्या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ , तालुकाध्यक्ष विशाल सोनार , जिल्हा उपाध्यक्ष संदीप चौधरी , ग्यानू पाटील , तालुका उपाध्यक्ष गोकुळ वाल्हे , शहराध्यक्ष अंबादास लोहार , सुहास महाजन , तालुका उप संघटक गणेश जाधव , पारोळा तालुकाध्यक्ष सुरेश शिंदे , अरुण लोहार आदींच्या सह्या आहेत .