एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोलमधील रहिवासी आणि आता मुंबईचे रहिवासी आणि किर्गिस्तानचे राजकीय अधिकारी देवेंद्र साळी यांनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ गांधीजीपुरा भागातील हनुमान मंदिरात २० किलो शुद्ध पितळाची घंटा भेट म्हणून दिली. तसेच यापूर्वी त्यांनी मंदिराच्या नूतनीकरणासाठी १ लाख रुपये दिले होते.

दि.२४ रोजी सकाळी ११ वाजता गांधी पुरा भागातील हनुमान मंदीरात देवेंद्र साळी व त्यांचे छोटे बंधु संदिप साळी यांच्या हस्ते घंटेचे विधिवत पुजन करण्यात आले.यावेळी सर्वांनी हनुमंताची आरती केली.यावेळी बोलतांना देवेंद्र साळी यांनी आपल्या लहान पणाच्या आठवणी सांगितल्या व गेल्या वर्षी त्यांचे वडील माजी उपनगराध्यक्ष प्रकाश साळी यांचे कोरोना या आजाराने निधन झाले होते.त्यांच्या आठवणीत सदर घंटा मंदिरास भेट म्हणुन देत असल्याचे सांगितले.यावेळी ते भावुक झाले होते.
याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, जेष्ठ पत्रकार आल्हाद जोशी, बजरंग ट्रेडर्सचे बाळु चौधरी,सामाजिक कार्यकर्ते दशरथ चौधरी, चिंतामण पाटील, संजय पाटील, माजी नगरसेवक सुनील चौधरी, प्रदिप मराठे, गणेश साळी, प्रमोद बडगुजर, शरद पाटील,पवन पाटील, दिनेश घुगे आदी उपस्थित होते.







