एरंडोल ( प्रतिनिधी ) – कोविड महामारीच्या अनुषंगाने एरंडोल शहरातील सर्व सार्वजनिक रजिस्ट्रेशन मंडळ व शहरातील लहान – मोठे मंडळ व पोलीस प्रशासन यांच्या तर्फे संपूर्ण एरंडोल शहरात एक गाव एक गणपतीची स्थापना रा.ती काबरे महाविद्यालयाच्या प्रांगणावर गणरायाची स्थापना करण्यात आली होती. गणरायाच्या स्थापनेपासून तर विसर्जना दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये.शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यां धुवून त्यांना माल्यार्पण करणे,परिसर स्वच्छ करणे, रक्तदान शिबिर घेण्यात आले होते तसेच जवळपास 200 वृक्षाचे रोपण शहरातील विविध ठिकाणी करण्यात आले. लहान मुले मुली व माता-भगिनींना उत्साह येण्यासाठी रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. दररोज रात्री आठ वाजता शहरातील पाच सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांना आरती करण्याचा मान देण्यात आला.तसेच दररोज सकाळी आठ वाजता वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांना आरतीच्या मान देण्यात आला. तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करून रांगोळी व निबंध स्पर्धेत प्रथम द्वितीय आलेल्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. शहरात एक गाव एक गणपतीची स्थापना केल्यामुळे शहरातील सार्वजनिक मंडळांवर लहान गणपतीची स्थापना करण्यात आली होती येथील गणपतींचे विसर्जन एरंडोल नगरपालिका व पोलिस प्रशासनातर्फे ट्रॅक्टर वर विसर्जन रथ बनवण्यात आला होता. नगरपालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी हे प्रत्येक मंडळावर जाऊन गणरायांच्या मूर्त्यांना तेथील कार्यकर्त्यांनी जवळून घेऊन विसर्जन सुरत मध्ये ठेवत होते.नगरपालिकेतर्फे शहरातील चार भागांमध्ये गणरायाच्या मूर्तीचे संकलन व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. याठिकाणी शहरातील घरगुती गणपतीचे संकलन करण्यात येत होते. रा.ती काबरे महाविद्यालयाच्या पटांगणावर एक गाव एक गणपतीचे विसर्जन दुपारी सव्वा बारा वाजेच्या दरम्यान करण्यात आले.यावेळी उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी प्रशासनातर्फे सर्व नागरिकांचे आभार मानले. गेल्या तीन महिन्यापासून अनेक वेळा शहरातील नागरिकांचे, गणपती मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य यांची मीटिंग घेऊन एक गाव एक गणपतीची स्थापना करण्याचे आव्हान करण्यात आले होते आणि आज ते सफल झाले. या गोष्टीचा मला फार आनंद झाला आहे. असे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आवर्जून सांगितले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, प्रांताधिकारी विनय गोसावी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी किशोर निंबाळकर, रवींद्र महाजन, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय चौधरी, आर डी पाटील, नायब तहसीलदार एस पी शिरसाट, तहसील कार्यालयाचे विनायक मानकुबरे, सलमान तडवी, ठोंबरे आप्पा, निंबाळकर भाऊसाहेब, शिवाजीराव अहिराव, नगरसेवक अँड नितीन महाजन, योगेश महाजन, मोहन चव्हाण, विठ्ठल आंधळे, हे मान्यवर विसर्जन वेळी उपस्थित होते. एक गाव एक गणपती या ठिकाणी मनोज ठाकूर पियुष चौधरी गुलाब चौधरी जितेंद्र परदेशी हवलदार संदीप सातपुते अकिल मुजावर अनिल पाटील सुनील लोहार यांनी परिश्रम घेतले. जुने पद्मालय येथे नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह व तलावात पोहणाऱ्यासह या गावातील घरगुती गणपतीचे विसर्जन विधिवत पूजा करून करण्यात येत होते.दरम्यान एरंडोल शहरात नाद ढोल – ताशाचा गजर ना गुलालाची उधळण ना मिरवणूक अतिशय शांततेच्या वातावरणात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात निरोप देण्यात आला.