जळगाव (प्रतिनिधी ) ;– एरंडोल येथील अट्टल मोटारसायकल चोरट्याला एलसीबीच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. अजय संजय मोरे वय २१ रा. सिद्धिविनायक पेट्रोल पंप पिंपरी खुर्द धरणगाव असे आरोपीचे नाव आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ . अशोक महाजन, प्रदीप पाटील,दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, सचिन महाजन ,अशोक पाटील , मुरलीधर बारी आदींच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्यासोबत कल्पेश उर्फ रघुराम मागं मालचे वय २२ रा. भोद , नामदेव रोहिदास भिल वय २९ रा. भोद यांच्याकडून बजाज कॅंम्पनीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.