एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील घटना
एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील कासोदा येथे सुगंधित सुपारी, सुंगधित तंबाखू यांचा विक्रीसाठी आणलेल्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासन खाते व पोलिसांनी छापा टाकला. येथील साई गजानन प्रोव्हिजन या किराणा दुकानात दिनांक ४ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास तपासणी पथकाने सुमारे ७९ हजार ४२८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
संशयित आरोपी नीलेश मधुकर चिंचोले (वय ३७) यास कासोदा पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.येथील भडगाव रोडवरील साई गजानन प्रोव्हिजन या किराणा दुकानामध्ये सुगंधित सुपारी व सुगंधित तंबाखू असत्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक उपायुक्त वि. प. धवड यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने या ठिकाणी छापा टाकला. दुकानातून एकूण ७९ हजार ४२८ रु. किमतीचा माल पथकाने जप्त केला. अधिकारी शरद पवार यांच्या तक्रारीनुसार नीलेश चिंचोले याच्याविरोधात कासोदा पोलीस ठाण्यात प्रतिबंधित पानमसाला साठवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.