एरंडोल: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सिगरेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ च्या प्रभावी अंमलबजावणी साठी तहसिलदार सुचिता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील एरंडोल तालुकास्तरीय समन्वय व संनियंत्रण समितिची स्थापन करण्यात आली आहे.
या समितीत शहरातील आरोग्य दूत युवराज उर्फ विक्की खोकरे ,सामाजिक कार्यकर्ते प्रा.आर एस पाटील, अरुण रामरतन साळी यां तिघांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
स्थापन झालेल्या आठ सदस्यिय समन्वय सदस्यांमध्ये गटविकास अधिकारी दादाजी जाधव, पोलिस निरीक्षक सतिष गोराडे, वैद्यकीय अधिक्षक दिपक जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज चौधरी,यांचाही समावेश आहे.