जळगावातील घटना, १० संशयितांना अटक
जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसीतील हॉटेल सुमेरसिंग समोर दोन गटात आपापसात हाणामारी सुरू असतांना पोलीसांनी आवरण्याचा प्रयत्न केला. परंतू रागातून गटातील इतरांनी पोलीसांसह वाहनांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी २ जुलै रोजी पहाटे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी परिसरातील जळगाव-औरंगाबाद रोडवरील हॉटेल सुमेरसिंगजवळ शनिवारी १ जूलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दोन गटात आपापसात भांडण सुरू होते. त्यावेळी दोन्ही गटातील तरूण एकमेकांमध्ये दगडफेक करीत होते. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी दोन्ही गटातील भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही गटातील ८ ते १० जणांनी पोलीसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील, दिपक सोनवणे हे जखमी झाले. शिवाय दुचाकीच्या काचा देखील फोडल्या गेल्या.
दोन्ही गटातून दगडफेक झाल्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेप्रकरणी रविवारी २ जुलै रोजी पहाटे ४ वाजता पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी तुषार प्रमोद कोळी (वय २० वर्षे, रा. रामेश्वर कॉलनी,जळगाव), कृष्णा रघुनाथ भालेराव (वय २३ वर्षे, रा. इंदिरानगर, कुसुंबा ता. जि. जळगाव), शरद अशोक पाटील (वय १९ वर्षे, रा. कुसुंबा ता. जि. जळगाव), सागर तिरसिंग पाटील, (वय २२ वर्षे, रा. दत्तमंदिर जवळ, कुसुंवा), रोहीत धनसिंग राजपुत (वय १९ वर्ष, रा. दत्तमंदिर जवळ, कुसुंबा), नितीन दशरथ निकम, (वय ३३ वर्षे, रा. अशोक नगर, सुभाष टेकडी, उल्हासनगर पूर्व), शेखर अशोक सुर्यवंशी (वय २४ वर्षे, रा. इंदिरा नगर, कुसुंबा), मोहसीन खान रहीमतुल्ला खान (वय ३० वर्षे, रा. पोलीस कॉलनी, सुप्रीम कॉलनी, जळगाव), वसीम सलीम खान (वय ३३ वर्षे, रा. खुबानगर, सुप्रीम कॉलनी), समीर गफ्फार मनियार (वय २३ वर्षे, पोलीस कॉलनी, सुप्रीम कॉलनी जळगाव), शाहीद शेख सलीम रा. खुबा नगर सुप्रिम कॉलनी, शाकोर पुर्ण नाव माहीत नाही रा. सुप्रिम कॉलनी, व इतर ०८ ते १० इसम यांच्यावर गुन्हा दाखल असून पहिल्या अनुक्रमे दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.