जळगाव ;- येथील कंवर नगरातून एलसीडी टीव्ही चोरून नेणाऱ्या चोरट्याला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे .

व्यावसायिक लखमीचंद घनश्यामदास आडवाणी (वय-४०) यांचे कंवरनगरात जुने घर आहे, घर बंद असल्याचे पाहून चोरट्याने घराचे स्टोअर रूम फोडून घरातून २० हजार रूपये किंमतीचा एल.सी.डी. टीव्ही चोरून नेल्याचे ११ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी लखमीचंद आडवाणी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक विलास शेडे यांच्या पथकाने संशयित आरोपी संतोष माणिक सोनार (वय-२०) रा. सिंधी कॉलनी याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शेडे करीत आहे.







