मुंबई ( प्रतिनिधी )- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर क्रिटीकल शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलाने दिली.

पुणे जमीन घोटाळा खटल्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे मुंबई सेशन कोर्टात अनुपस्थित आहेत. खडसे आजारी असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी कोर्टात दिली. मंदाकिनी खडसे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. त्यात खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी या दोघांची आरोपी म्हणून नावं आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी सध्या अटकेत आहेत. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंच्या या माहितीनंतर टीकास्त्र सोडलं आहे. एकनाथराव खडसे हे खोट्यावर खोटं बोलत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.







