जळगाव (प्रतिनिधी) : एकलव्य संघटनेने राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला. संघटनेचे संस्थापक प्रदेश अध्यक्ष पवनराजे सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ व कार्यकारणी सदस्य यांनी आपले पाठिंबा पत्र जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढणार असून जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांचा विजय अधिक सोपा होणार आहे.
यावेळी चाळीसगाव मतदारसंघाचे आ. मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आ. राजुमामा भोळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे आदी उपस्थित होते. एकलव्य संघटनेचे महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. समाजाच्या न्याय हक्कांसाठी एकलव्य संघटना निरंतर लढत असते. एकलव्य संघटनेच्या विचारांच्या माध्यमातून गाव खेड्यावर कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झालेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपेक्षित दुर्लक्षित समाजाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल संघटनेने त्यांचे अभिनंदन केलेले आहे.
एकलव्य संघटनेचे हे पाऊल अत्यंत अभिमानाचे असून राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकलव्य संघटनेच्या भूमिकेचे स्वागत केलेले आहे. यावेळी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवन राजे सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकरवाघ, प्रदेश सचिव मधुकर पवार, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब बर्डे, जळगाव लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष संजूबाबा सोनवणे, रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष रवि सोनवणे, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पिंटू गायकवाड आदी उपस्थित होते.