मलकापूर ( प्रतिनिधी ) – बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे एकाच दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. एका तरुणाने घरात गळफास घेत तर दुसऱ्याने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली.
किशोर वानखेडे ( वय – 29 ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मलकापूर शहरातील मंगलगेट परिसरातील रहिवाशी होता. रोशन टावरी ( वय – ३८ ) असे दुसऱ्या तरुणाचे नाव असून तो वृंदावननगर येथे राहत होता.
किशोरने काल दुपारी साडेतीनच्या सुमारास राहत्या घरातील मागच्या खोलीत टिनाच्या पाईपला साडीने गळफास लावून घेतला. रोशनने वृंदावन नगरच्या मागे असलेल्या शेतातील आंब्याला झाडाखाली विष घेऊन आत्महत्या केली. या तरुणांनी आत्महत्या का केली याचे कारण लगेच स्पष्ट झाले नाही.