यावल ( प्रतिनिधी ) – साकळी येथील माहेर असलेल्या विवाहितेचा १ लाखासाठी सासरच्या मंडळीकडून छळ होत असल्याने पतीसह चार जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकळी येथील माहेर असलेल्या शमिमबी शेख अनवर (वय-२२) यांचा विवाहित यावलच्या आयशानगरातील शेख अनवर शेख मुसा यांच्याशी २०१९ मध्ये झाला. काही दिवस चांगले गेल्यानंतर पती शेख अनवर शेख मुसा याने विवाहितेला माहेरहून १ लाख रूपये आणण्याची मागणी केली. विवाहितेच्या आईवडीलांची परिस्थिती हालाखीची असल्याने पैशांची पुर्तता करू शकत नाही असे सांगितल्यावर विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. सासू व सासरे, जेठ आणि जेठाणी यांनी विवाहितेला शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत विवाहितेला घरातून हाकलून दिले. या छळाला कंटाळून विवाहिता मोहरी निघून आल्या. विवाहितने सोमवारी रात्री यावल पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात पती शेख अनवर , सासरे शेख मुसा , सासू नमजाबी शेख, जेठ शेख मोमीन आणि जेठाणी नसीमबी शेख ( सर्व रा. आयशा नगर, यावल ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स फौ विजय पाचपोळ करीत आहेत.









