लाखांची रोकड घेऊन सात जण फरारी !
बोदवड (प्रतिनिधी) :- युट्युबवर एक लाख रुपयांच्या बदल्यात ५ लाख रुपयांचे आमिष देऊन मध्यप्रदेशच्या व्यापाऱ्याला बेदम मारहाण करून एक लाखांची रोकड जबरदस्तीने हिसकावून ७ जणांनी पळ काढल्याची घटना २७ रोजी मुक्ताईनगर रोडवरील नांदगाव उड्डाणपुलाजवळील कोल्हादी गावाकडे जाणार्या रस्त्यावर सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी ७ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (२७ नोव्हेंबर २०२५) सकाळी ६ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर रोडवर फिर्यादी प्रेमचंदजी पिपलोदिया (वय ४४, व्यवसाय-इलेक्ट्रिक दुकान, रा. डाक बंगला जवळ, सुसनेर, ता. सुसनेर, जि. आगर, मध्य प्रदेश) यांना आरोपींनी युट्यूब व्हिडिओद्वारे अमिष दाखवून फिर्यादींना वर नमुद ठिकाणी बोलावले आणि “भारतीय बच्चो का बँक” असे लिहिलेल्या लहान मुलांच्या खेळण्यांमधील नोटा देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, फिर्यादींनी एक लाख देण्याचे नाकारल्यावर आरोपी क्रमांक १ ते ७ यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्र गिरीराज परमानंदजी पवार यांना मारहाण करून फिर्यादीजवळ असलेली पिशवीत ठेवलेली रोकड हिसकावून नेली.
या आरोपींमध्ये सैय्यद साबीर सैय्यद शफिक (वय ३०, रा. कु-हा काकोडा, ता. मुक्ताईनगर),अंकल अशोक पारधी (वय २८, रा. रेवती, ता. बोदवड),करण किरण बोदडे (रा. शेलवड, ता. बोदवड),प्रशांत समाधान पाटील (रा. कु-हा काकोडा, ता. मु.नगर),सैय्यद शेरीफ सैय्यद शफिक (रा. कु-हा काकोडा, ता. मु.नगर),निलेश ईश्वर गुरचळ (रा. नाडगाव, ता. बोदवड), विकी ईश्वर गुरचळ (रा. नाडगाव, ता. बोदवड).यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.









