जळगाव (प्रतिनिधी ) ;- जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी ची नूतन महानगर अध्यक्षा मंगला पाटील यांनी पदभार स्वीकारल्याचे पहिल्याच दिवशी शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकान गोडाऊनला भेट दिली. गरिबांना धान्य मिळत आहे कि नाही , त्यांना अन्नधान्य मिळण्यास कोणत्या अडचणी आहेत या सर्व गोष्टी मंगला पाटील यांनी जाणून घेत समस्या सोडविण्याचे आवाहन केले.