जळगाव (प्रतिनिधी) – येथील प्रभाग क्रमांक १८ येथील सर्व्हे नं. १६ मध्ये नगरसेवक इब्राहिम पटेल यांच्या प्रयत्नातून रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून नागरिकांसाठी रस्त्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे.
रस्त्यांच्या कामांचे उदघाटन महापौर जयश्री महाजन यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रभागात पाहणी करून अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. मराठी शाळा, मुलतानी रुग्णालयाचा रस्ता, अक्सा नगर, गणेशपुरी आदी भागात डांबरीकरण सुरु आहे. येत्या ४ दिवसात नागरिकांना रस्त्यांची सुविधा सुरु होणार आहे. परिसरात एक कोटींची कामे सुरु असून नगरसेवक पटेल हे दररोज निरीक्षण करीत आहे. पुढील काळात ६ कोटींची कामे प्रस्तावित असून त्याबाबत नगरसेवक इब्राहिम पटेल सातत्याने पाठपुरावा करीत आहे.