राज्य शासनाच्या गृह विभागाकडून आदेश जाहीर
जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने प्रशासकीय कारणास्तव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनांबाबत आदेश गुरुवारी दि. ३१ जुलै रोजी जारी केला आहे. शासनाच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात ३ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात २ रिक्त पदी तर जळगावचे संदीप गावित हे भुसावळ येथे जाणार आहेत.
राज्य शासनाने पोलीस उप अधीक्षक/ सहा. पोलीस आयुक्त (निःशस्त्र)” या संवर्गातील ६५ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी जारी केले आहेत. त्यात जळगाव शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांची भुसावळ शहर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.त्यांच्या रिक्तपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली नाही.(केसीएन)जळगाव जिल्ह्यात बाहेरून २ उपअधीक्षक येणार असून त्यात चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून विजय ठाकुरवाड तर नागपूर ग्रामीण येथून बापू रोहोम यांची मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्यात काम केले असून एकंदरीत जळगावात जिल्ह्याचा अनुभव असलेले तिघे अधिकारी असणार आहेत.