भुसावळ गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार – डीवायएसपी वाघचौरे यांची माहिती

भुसावळ/जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात नागरिकांच्या काय अडचणी आहेत. त्यांना होणाऱ्या त्रासापासून कशी मुक्तता करता येईल यासाठी तालुक्यातील गावांची भेटी घेणे सुरू आहे. प्रत्येक गावातील गुन्हेगारांचे प्रमाण व गुन्हेगारीचे विश्लेषण करून माहिती संकलन करणे सुरू आहे, असे सांगत भुसावळ तालुका लवकरच गुन्हेगारी मुक्त करेल, अशी माहिती नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
भुसावळ शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठे आहे.याठिकाणी रेल्वे स्टेशन, आयुध निर्माणी, दिपनगर,औद्योगिक वसाहत असे आहेत.याठिकाणी कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.याचाच फायदा काही गुन्हेगार घेत आहेत.शहरात अवैध धंदे, खून,दरोडे,घरफोडी,बंदूक,तलवार,चाकू असे अनेक हत्यार गुन्हेगारांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.तसेच खंडणी व धमक्या सारखे गुन्हे ही दाखल आहेत.या सर्व गुन्हेगारांवर भुसावळ तालुक्यातील पोलीस स्टेशनला किती गुन्हे दाखल आहेत यासाठी डिजिटल तंत्राचा वापर करून सर्व गुन्हेगारांची माहिती(डाटा)स्वतः पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे आपल्या जवळ जमा करणार आहेत.
गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.शहरातील वाहतूक,चित्र विचीत्र बॅनर यामुळे विद्रुपीकरण निर्माण होत आहे.तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून लवकरच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन कारवाई केली जाणार आहे.ज्याप्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हेगारी मुक्त केले होते तोच पॅटन भुसावळासाठी वापरण्यात येणारी असून गुन्हेगारी नियंत्रणात आणली जाणार आहे.अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.







