चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यात दि. १९ रोजी नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात आल्यानंतर आणखी एका बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले आहे. त्यामुळॆ वनविभागाला ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहे. एका पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला आहे.
चाळीसगाव तालुक्यात दि. १४ रोजी सायंकाळी गणेशपूर येथील एका बालकाचा बिबट्याने बळी घेतल्यानंतर ग्रामस्थ धास्तावले होते. वनविभागाने जनजागृती करीत ट्रॅप पिंजरे लावताच १९ रोजी एका बिबट्याला पकडण्यात आले व नंतर पुन्हा २१ रोजी बिबट्याला पकडण्यात यश आले. सुरक्षित स्थळी बिबट्याला हलवण्यात आले आहे. ही कारवाई सहाय्यक वनरक्षक अमोल पंडित, चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे व इतर सर्व वन कर्मचार्यांनी केली.