• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

दुर्मिळ घटनेत, विवाहितेने दिला अविकसित सयामी जुळ्यांना जन्म !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2023
in Uncategorized
0

जळगाव “जीएमसी” मध्ये महिलेला

मिळाला शस्त्रक्रियेद्वारे दिलासा

जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागामध्ये एका २२ वर्षीय विवाहितेची सिजर प्रसूती झाली. मात्र मात्र हे गर्भ अविकसित होते. तसेच ते एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत व्यंगात्मक पद्धतीने सयामी जुळे होते. ते काही क्षणांनी मृत्यू झाले. त्यामुळे तात्काळ सिजर प्रसुती करून महिलेला दिलासा देण्यात आला. ही शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात यशस्वी झाल्याने अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केलं आहे.

एरंडोल तालुक्यातील २२ वर्षे विवाहिता ही गरोदर असल्याने तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आली होती. तेथे तिची सोनोग्राफी केली असता तिच्या पोटामध्ये पाच महिन्याचा अविकसित गर्भ त्यातही दोन बाळे सयामी, एकमेकांना जुळलेली अशा व्यंगात्मक परिस्थितीत सोनोग्राफीमध्ये आढळून आली. त्यामुळे स्त्रीरोग विभागाच्या डॉक्टरांनी तात्काळ दिला दाखल करण्याचा निर्णय घेतला.तिच्या शरीरात ६ हिमोग्लोबिन एवढेच रक्त होते. दोन थैल्या रक्त चढवल्यानंतर अविकसित गर्भ बाहेर काढण्यासाठी सिजर प्रसूती करण्यात आली. प्रसुती दरम्यान सदर महिलेच्या पोटातून एकमेकांना जुळलेले व्यंगात्मक पद्धतीचे सयामी जुळे असलेले दोन बाळ वैद्यकीय पथकाने बाहेर काढले. मात्र काही क्षणातच ते दगावले.

त्यानंतर महिलेवर औषधोपचार करून प्रकृती आता स्थिर आहे. महिलेला दिलासा देण्याकामी स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. संजय बनसोडे, डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. राहुल कातकाडे, डॉ. विनेश पावरा, डॉ. रणजीत पावरा, डॉ. अमृता दुधेकर, डॉ. पूजा बुजाडे, डॉ. पूजा वाघमारे यांच्यासह इन्चार्ज परिचारिका नीला जोशी यांच्या स्टाफने परिश्रम घेतले. सदरहू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल तसेच रुग्णाला दिलासा दिल्यामुळे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे.

वेळोवेळी सोनोग्राफी आवश्यक

“सदर महिलेची सिजर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. महिलेला सयामी जुळे झाले होते. मात्र व्यंगात्मक असल्यामुळे हे सयामी जुळे काही क्षणातच मृत झाले. ग्रामीण भागातील बहुतांश महिला या सोनोग्राफी वेळेवरती करीत नाहीत. तसेच बिजांड फलित होण्याचे विघटन चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे अशा पद्धतीचे व्यंगात्मक गर्भ तयार होतात. त्यामुळे गरोदरपणामध्ये खूप काळजी घेऊन सोनोग्राफीदेखील वेळोवेळी केले पाहिजे.

-डॉ. संजय बनसोडे, सहयोगी प्राध्यापक, जीएमसी, जळगाव.

मृतांचे शव अभ्यासासाठी

रुग्णालयात सदर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ही दुर्मिळ घटना आहे. सदरहू मृत बाळांचे शव हे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकरिता महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र विभागांमध्ये ठेवण्यात येत आहे.

– डॉ. गिरीश ठाकूर
अधिष्ठाता, जी.एम.सी., जळगाव


 

Tags: #jalgaon civil hospital #maharashtrahttps://kesariraj.com/durmil-ghatna-news
Previous Post

अखिल भारतीय साहित्य परिषदेची चोपडा तालुका कार्यकारिणी घोषित

Next Post

पट्ठ्या सुट्टीत गावाला गेला अन् गावठी कट्टा उचलून आणला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पट्ठ्या सुट्टीत गावाला गेला अन् गावठी कट्टा उचलून आणला !

पट्ठ्या सुट्टीत गावाला गेला अन् गावठी कट्टा उचलून आणला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon